Avoid Copy Paste

Thursday, December 10, 2009

अनवाणी कथा आणि माझा मेंदू

व्यंकटेश माडगुळकरांची "अनवाणी" कथा वाचली, जांभळीचे दिवस मधली. वाचतांना आठवले, ही गोष्ट लहानपणी "बालचित्रवाणी" मध्ये पाहिली होती कधीकाळी.

पाय अधु असलेली लहान मुलगी-तिच्या घरी येणारा अनवाणी पोस्टमन-त्याला चप्पल देण्याचा तिचा निर्णय-त्याच्या पायाचे माप घेण्यासाठी अंगणातल्या तापलेल्या वाळूत जातांना तिची झालेली केविलवाणी अवस्था-त्याला चप्पल देतांना तिला झालेला आनंद आणि मग त्या पोस्टमनचे विभाग बदलून मागणे, तिला फेस करावे लागु नये म्हणून.

एकदम झपझप डोळ्यासमोरुन गेल हे सगळ. ते जसच्या तस कस लक्षात राहील असेन? ते पाहून निदान १२-१५ वर्ष तरी उलटून गेली आहेत. न वापरलेल्या, खुप जुन्या अश्या गोष्टी मेंदू विसरत जातो आणि तसे होणे नैसर्गिक पण आहे. नाहीतर मेंदूचा भुगा होईल सार लक्षात राहील्याने आणि माणूस सुखी होणार नाही कारण दुखा:चा कोणाला विसरच पडणार नाही.
मग असे काही कसे काय एकदम आठवणीत राहून जात असेल?

No comments:

Post a Comment