Avoid Copy Paste

Tuesday, June 27, 2017

सोबत

(ह्या पोस्ट मधले लिखाण माझे नाही. व्हाट्स अँप च्या माध्यमातुन जे असंख्य फॉरवर्ड्स येतात त्यातले काही संग्रही ठेवण्या सारखे वाटले; शेयर करावेसे वाटले, तसाच हा एक लेख. ह्या लेखाचे सर्व हक्क त्या अज्ञात लेखका अधीन.)  

सोबत

आजकाल कुणाशीही बोलावसं वाटत नाही. खूप खूप कंटाळा येतो. सगळीकडे मुखवटे चढवलेले चेहरे. ज्याची पाठ फिरेल त्याची निंदा करणारे. ह्यांची मानसिकता इतकी चीप असते ना की नको वाटतं. इतकं खोटं कसं काय ते वागू शकतात? ह्यात आपले लोक पण असतात हे विशेष! ज्यांच्यासाठी तुम्ही कितीतरी वेळेला एडजस्टमेंट केलेली असते ते देखील एका नकाराने बदललेले बघितले आणि वाटलं, ‘आपण एकटे असतो तेच बरं असतं.’ ह्यांच्यापेक्षा पुस्तकांमध्ये आणि छंदामध्ये रमावं, मन प्रसन्न राहतं आणि नकारात्मक गोष्टींपासून तुम्ही स्वाभाविकपणे दूर जाता. 

कधीतरी अशी वेळ येते की तुम्हाला माणसांचाच कंटाळा येऊ लागतो. त्यांना सांभाळून घेताना तुमची प्रचंड दमछाक होते.प्रत्येकाचे मूड्स संभाळण, त्यांच्या मनाप्रमाणे वागणं ह्या सगळ्यात आपण पार दमून जातो. सतत दुसऱ्यांचा विचार करताना आपल्याला “स्वतःला काय हवं आहे” हा प्रश्न कधी मागे राहतो हे काळतच नाहि. आपण इतकं सगळं करूनही आपल्याला प्रेमाचे दोन शब्द, नात्यात हवा असलेला आदर, विश्वास, आपुलकी मिळते असंही नाही.

मग अशा वेळी प्रश्न पडतो “हे सगळं कशासाठी?”

खूप विचार केला की ह्या प्रश्नाचे एक उत्तर असं मिळतं ते म्हणजे – “आपण एकटेपणाला घाबरतो.”

सुरक्षतेसाठी कळपात राहिलं पाहिजे हि एक चुकीची मानसिकता आपल्यात रुजलेली असते. एकटे पडू या भीतीमुळे अनेकदा आपण चुकीच्या गोष्टींना सपोर्ट करतो. मनात नसूनही अनेक गोष्टी स्वीकारत जातो. मोठे होतो पण “सोबत”, “मैत्री” ह्या गोष्टींचे आणि नात्यांचे खरे अर्थ विसरतो. लोकांनी शरीराने आपल्या सोबत असण्याला “सोबत” असं गोंडस नाव देतो. आपणही तसेच खोटे वागत जातो, पण एक क्षण असा येतो जेव्हा हा माणसांचा गोतावळा नकोस होतो. मोजकीच पण चांगली माणसं हवीत असं वाटू लागतं. ह्या मुखवट्या मागचे चेहरे भेसूर वाटू लागतात आणि आपण पुन्हा स्वतःकडे वळतो. जाणीवेचा एकच क्षण असतो आणि तो आपल्या हातून कधीच निसटू द्यायचा नसतो.

‘मी उत्तम तेच करीन आणि चांगल्या लोकांच्या सोबतीतच राहीन’ असा मनाशी निश्चय केला की आपली निवड बदलत जाते आणि पर्यायाने आयुष्यही बदलतं. मोजकीच पण प्रेमळ, आपल्याशी प्रामाणिक भावनेने जोडलेली, वेळ प्रसंगी हितासाठी थोडीशी रागावणारी माणसं म्हणजे खरी –

“सोबत…!”

माणसांच्या गर्दीत चालताना आपला दीपस्तंभ कुणाला मानायचं हे आपणच ठरवायच

(ह्या पोस्ट मधले लिखाण माझे नाही. व्हाट्स अँप च्या माध्यमातुन जे असंख्य फॉरवर्ड्स येतात त्यातले काही संग्रही ठेवण्या सारखे वाटले; शेयर करावेसे वाटले, तसाच हा एक लेख. ह्या लेखाचे सर्व हक्क त्या अज्ञात लेखका अधीन.)  

Thursday, September 24, 2015

आजकाल काय नवीन लिहिलस?


गेल्या आठवड्यात कुणीतरी विचारले, काय रे, खूप दिवसात काही नवीन नाही वाचल तुझ्याकडून. सवयीप्रमाणे हसून विषय टाळला.  इतरांना टाळता येत, पण स्वताला कसा टाळणार 

मी १: “आजकाल काय नवीन लिहिलस?”
मी २: “काही नाही
मी १: “अरे, कधीतरी लिहिलं असशील ना?”
मी २: “नाही रे. शेवटची कविता लिहिली त्याला उलटून तीन वर्षतरी झालीत, दैनंदिनीची दैना तर विचारूच नकोस
मी १: “का रे, काय झाले?”
मी २: “काही विशेष नाही.”
मी १: “मला वाटलं इतके महत्वाचे टप्पे आलेत आयुष्यात, त्याच काही छानसं टिपण केल असशील.”

मी २: “हाच प्रश्न दुसऱ्याकुणी विचारला असता तर सांगितले असते कि, सुचत नाही आजकाल. खर सांगू का, तस नाहीये; खरतर वेळच नाही मिळत. काय होत कि, एक काहीतरी कल्पना डोळ्यासमोर येते, sorry, येते म्हणण्यापेक्षा समोर जे असत त्यात काहीतरी वेगळेपण दिसत. त्या कल्पनेभोवती शब्द गुंफायला लागले कि काहीतरी जन्म घेतं; कविता, लेख, रोजनिशी, चारोळी वगैरे. पण शब्द गुंफण्यासाठी त्या गोष्टीचा थोडा विचार करावा लागतो. थोडावेळ त्याबरोबर घालवला कि पुढच आपसूक येत. पण नेमकं तेच जमत नाही आणि मग रोजच्या गडबडीत ती कल्पना हरवून जाते, शब्दरूप होण्याआधी.

मी १: “म्हणण्यात खंत जाणवते आहे तुझ्या.”

मी २: “नाही. ते तस होतंय याची खंत नाहीये मला, पण वाईट वाटत कधी कधी. गेल्या काही वर्षात आयुष्यात इतके बदल घडले, ते सारे जगण्यात, अनुभवण्यात वेळ कसा जातोय  ते कळलेच नाही. लिहितांना ज्या परिस्थितीबद्दल लिहितो, त्यातून बाहेर येवून ती एका त्रयस्थासारखी पहावी लागते. आयुष्यात मी इतका रममाण झालोय कि त्यातून बाहेर येऊन त्याबद्दल लिहावं अस नाही वाटलं गेल्या काही वर्षांत. आयुष्य पूर्णपणे जगण्यात मी आनंदी आहे, कधी त्याबाहेर येण्याची इच्छा झाली नाही, आयुष्यात इतके कंगोरे आलेत कि त्यांनाच पूर्णपणे वेळ देत येत नाही. मग या सगळ्यात राहून जातं लिखाण 

मी १: “हे बघ, सुचत कस हे तुझ म्हणण मला पटतंय. गडबडीत कल्पना हरवून जाते हे सुद्धा पटण्या सारखे आहे. पण निव्वळ वेळ नाही म्हणून लिहिण होत नाही हे काही मला पटत नाही. गेल्या महिन्यातला हेंल्थचेकप आठव.”  

डायटीशियन: (रिपोर्ट्स पाहून) "व्यायाम का करत नाही ?".

मी २: " रोजच्या व्यापात नाही जमत हो, वेळच नसतो”.

डायटीशियन: "एका आठवड्यात TV, laptop वर साधारणत: किती वेळ टाईमपास करता?"

मी २: "रोज ४५-६० मिनिटे आणि वीकेंडला १-२ मूवि, म्हणजे ७ दिवसात १२-१५ तास",

डायटीशियन: (उत्तरावर हसुन) "हाच वेळ तुम्ही, तर जे तुमच्यासाठी महत्वाच आहे त्यासाठी का नाही घालवु शकत?

मी २: "……"

डायटीशियन: "प्रश्न वेळेचा नसतो, प्रश्न priorityचा असतो, कितीही काम असल तरी भाजी आणताच ना? मासिक बिल भरणे राहू देता का? नाही ना. कारण या गोष्टीना तितकं महत्व देता. आपणच ठरवायचं महत्व कशाला द्यायचं, वेळ आपोआप निघतो"

मी २: "हो चांगलच आठवतय, आणि तसेही तू कुठे विसरू देणार आहेस "
मी १: "नाहीच विसरू देणार, लिहिण हे आपल्या "मी" असण्याचा भाग आहे. आपल्याला ते आवडत, त्यातून आपल्याला आनंद मिळतो, त्यामुळे त्याला तितकी  priority दिली पाहिजे, जे मला तरी दिसतंय कि तू देत नाहीयेस. मी पण तुला हेच सांगेन, तू ठरव  महत्व कशाला द्यायचं, वेळ आपोआप निघेल.”

Friday, May 30, 2014

"मायबोली" वरची नवी कथा "तीन तिघाडा"

आज बऱ्याच दिवसांनी "मायबोली" (www.maayboli.com) वर गेलो. आणि "कथा कादंबरी" 
मधली "तीन तिघाडा" http://www.maayboli.com/node/49162 नाव पहिले. काय आहे म्हणून सहज पहायला गेलो आणि संपूनच परत आलो. खूप दिवसांनी काहीतरी मस्त वाचायला मिळाले,so वाटले कि share करावे आणि जपून ठेवावे. म्हणून ते blog वर mention करून ठेवायचा हा उपद्याप :) 

कुठेतरी मग माझ्या पण  शाळेच्या आठवणींचा धागा सुरु झालाय, पण आता बराच उशीर झालाय आणि मित्रा ला भेटायला जायचे आहे, so सध्यातरी इथेच स्वल्पविराम देतो,  

Friday, April 29, 2011

|| नाती ||

नाती फुलांसारखी असतात. त्यांना उमलू द्यावं लागतं. पाणी बदलावं लागतं. उन दाखवावं लागतं. Basically लक्ष द्यावं लागतं. आपोआप उमलणारी गोष्ट नाही ती.
त्यांना pause , resume , नाही करता येत सोयीनुसार. काळ हा मोठा factor आहे नात्यात. बऱ्याच काळ काहीही खतपाणी न घातलेले नाते आताही तसच कसं राहील? "बिघडण्यासारखे काहीही घडले का?" हा विचार करण्यापेक्षा "जिवंत राहण्यासाठी काही केले का?" हा विचार करणे जास्त बरोबर नाही का? अगदीच खूप काही करायची गरज नसते, पण जेवढी असते तेवढी essential असते. एकदा का पाकळ्या कोमजू लागल्या कि फारसं काही करता येत नाही. लक्ष न देता उमलायची, सुगंधायची अपेक्षा करणे चूक नाही का ?

Monday, July 19, 2010

कृष्णा

कृष्णा
रविवारी सकाळी सकाळी टेबलावर ठेवलेला मोबाइल vibrate mode मुळे गुरगुरला. कालची संध्याकाळ जरा हेक्टिकच होती. ३ तासाचा romantic (?) movie पाहून प्रिया (माझी would be ) ला घरी सोडलं. त्याचा hangover घालवण्यासाठी टॅन्सी, रिमा आणि शेट्टी बरोबर उतू जाई पर्यंत कबाब खाल्ले आणि वरून २ ग्लास रेड वाईन. घरी पोचेपर्यंत ३ वाजले. सुखाने झोपावं म्हणून मोबाइल silent करून उताणा पडलो.
प्रिया इतक्या सकाळी फोन करणार नाही. रविवारी तर नाहीच नाही. असेल कुणीतरी म्हणून ignore मारला. पण २ वेळा बंद होऊनही तिसऱ्यांदा रिंग वाजली तेव्हा तिरमिरीत अ, भ ने सुरु होणाऱ्या शिव्या (मनात) देत चरफडत उठून फोन घेतला. कृष्णेचा फोन.
"गुरु ?" एकदम सावध प्रश्न.
"हो"
"मग १९ रिंग्ज वाजेपर्यंत उचलला का नाहीस" ती almost किंचाळत म्हणाली.
"झोपलो होतो"
"आता उठलास का मग"
"हो"
"गुड. मी airport बाहेरच्या आपल्या 24-hr cafe मध्ये बसलीये "
"तू ? पुण्यात ??" मी उडालोच "कधी आलीस, कशी काय... "
मला वाक्यही पूर्ण करू न देता ती परत ओरडली. "24-hr cafe अजून कुठे आहे ?"
"बर बर. आता सरळ सांगणार का?"
"भेटल्यावर सांगते. माझ्याकडे थोडाच talktime शिल्लक आहे, आणि मी रोमिंगवर आहे. तुझा बाबा आझम 486 जिवंत आहे का अजून? " (माझ्या P4 ला उद्देशून)
"हो आहे आजून. पण का?"
"१००० चा online recharge मार माझ्या नंबरवर. घोड्याचे लगाम उचल आणि निघ लवकर"
"जरा आवरतो आणि......"
"ए ! दातबीत घासत बसू नको. चुळ भर आणि निघ. चहा मी पाजते तुला आल्यावर"
"बर बाई. आलोच मी, एक पाऊण तासात"
"पाऊण तास ??? काय बाबांच्या यो बाईक वर येतोस काय? कि प्रियाने तुझा इतका brain wash मारलाय कि 220 CC Pulsar तु scooty सारखी चालवायला लागलास ?"
"कृष्णे !!!"
" ok ok, sorry. Usually २० मिनीटात येणारा तु ४५ मिनीटे म्हणालास म्हणुन जरा चिडचिड झाली. एकतर इथे मी एकटीच आहे आणि जाग्रणामुळे कंटाळली आहे. ये लवकर"

बऱ्याच दिवसांनी अंगात वारं भरल्यासारखी गाडी काढली. गार हवा कानावरून जायला लागली तश्या आठवणी झर झर सरकून गेल्या.
कृष्णाची पहिली भेट. First year ला. म्हणजे मी नाही भेटलो, तिच भेटली. तेव्हा मुलींशी बोलण्याइतके साहस कुठे होते :)

मी एका typical, निव्वळ option नाही म्हणून, गरजेपोटी एकत्र आलेल्या एका ग्रुपमध्ये होतो (obviously, तिथे सर्व मुलंच होती). कृष्णा एकदम आली आणि म्हणाली, "तू गुरु ना? first in board?"
"ho" मी उत्तरलो. माझ्याकडे वळलेल्या नजरांमुळे कावराबावरा होत. त्या नजरांमध्ये माझ्या कौतुकापेक्षा, एक मुलगी (आणि तीही छान दिसणारी) माझ्याशी स्वतःहून बोलतेय याचा हेवा होता.
"मी कृष्णा, तू कविता छान लिहितोस".
मी उडालोच. Usually "त्या" पहिल्या प्रश्नानंतर मला पुढचे नेहेमीचे, कुठला, कसा, कोण, क्लास कोणता वगैरे प्रश्न अपेक्षित होते. मी लिहिलेलं कुणी वाचत असेल, follow करत असेल अस वाटल नव्हतं मला.
"भेटू पुन्हा" ती हात पुढे करत म्हणाली. पुन्हा एकदा conscious होत मी handshake केला, त्याच "हेवा" नजरांच्या observation खाली.

"च्यायला, सकाळ आहे म्हणून काय नोएन्ट्री मधून यायचे ? " ब्रेक लावत समोरून येणाऱ्या काकांवर मी ओरडलो. त्याकडे लक्ष्यही ना देता काका निघूनही गेले. मग मीही चरफडत गाडी start केली. अठराव्या मिनीटाला विजयी मुद्रेने क्रुष्णेसमोर येउन बसलो.

"एक Ginger Tea, extra strong, without milk तिने माझासाठी आरोळी ठोकली" आणि order घेण्यासाठी येत असलेल्या वेटरला अर्ध्य़ातुनच परतवले.
"आत्ताच सुहासचा फोन ठेवला. सिडनीला जाऊन बसलाय माझा हिरो गेल्या १५ दिवसांपासुन". सुहास = क्रुष्णेचा धनी (तिच्याच शब्दात)
"मी प्रश्न विचारण्याची वाट पहाणार आहेस कि स्वत:हून बोलणार?" मी straight face देत विचारले.
"सांगते. पण त्याआधी plan ऎक. मी प्रचंड थकलीये. इथेच breakfast करु. मग pride ल जाऊ. २ रूम बुक करु. मग मी पडेन जरा"
"Hotel कशाला? माझ्या घरी रहा ना"
"नको. आपल्याला रात्री दंगा करता येनार नाही तुझ्याघरी. वरुन मी पिणार. ते तुझ्या घरी चालणार नाही"
"२ रूम?"
"मी Hotel मध्ये एकटी राहू?"
"....."
"असा प्रश्नार्थक चेहरा करु नकोस लगेच. मी रिमा आणि शेट़्टीला फोन केलाय. आपण चौघे hotel वर रहाणार. दंगापण करता येइल आणि मला रिमाची सोबत होईल झोपायला. शेट़्टीला जायचे तर जाऊ दे घरी. दुसरी रूम तुझ्यासाठी. तुला काही ईश्यू आहे का?"
"तस नाही..."
"तस अस काही नाही. पुढचे २ दिवस तु माझ्या दिमतीला हवा आहेस. उंडारण्यासाठी. रिमा, शेट़्टी असतीलच. हव तर प्रियालापण बोलव. पण तिला तिची Activa आणायला सांग. तुझ्यामागे मीच बसणार"
"अग पण..."
"तुला माहीतीयेना मी शेट़्टीच्या मागे कधीच बसत नाही. रिमाच्या Dio वर माझा विश्वास नाहीये आणि मला तुझ्या City मध्ये बसायचे नाहीये. मला बाईकवरच फिरायचे आहे."

Thursday, February 18, 2010

कंदिसा (kandisa)

आणि काल पुन्हा एकदा कंदिसाच्या प्रेमात पडलो. indian oceanचा हा album पहिल्यांदा ऐकला तेव्हा मनात फारसा भरला नव्हता. त्यातील शब्दांचा अभाव हे कारण असाव. पण नंतर जस जस ते परत परत ऐकत गेलो, ती गाणी, ते संगीत मनात भरत गेल. ते इतकं, की मग त्या band बद्दल शोधलं, वाचलं, त्या गाण्यांचे अर्थही शोधण्याचा प्रयत्न केला. मला त्यातला सर्वात जास्त आवडलेलं "मा रेवा" हे गाणं नर्मदा नदीसाठी आहे. कंदिसा हे कोण्या Aramaic भाषेतील प्रार्थना आहे अशी बरीच माहिती मिळाली. रूममध्ये अंधार करून iPod वर शांतपणे डोळे मिटून ते ऐकले की "ब्रम्हानंदी टाळी लागणे" काय असेल त्याचा प्रत्यय येतो.
घरून येतांना उतरत्या दुपारच्या वेळी बसच्या window seat मध्ये बसून त्यातील "Leaving Home" ऐकावं . मनात जे चाललेलं असतं तेच जसकाही संगीत बनून घुमू लागतं. येणारे हवेचे झोत, दूरवर दिसणारे डोंगर, मनात चाललेली चक्रे यात संगीत इतकं काही एकरूप होवून जात कि ते संगीत रहातच नाही. वातावरणाचाच ते एक भाग होवून जातं
http://en.wikipedia.org/wiki/Kandisa_(Album)
http://en.wikipedia.org/wiki/Indian_Ocean_(band)

Monday, December 14, 2009

मला बोलायाचे आहे (I want to talk)

This day is one of those where you feel like talking to somebody. Somebody, to whom who can say whatever you want without worrying about anything. Somebody who will just listen and talk to you, no matter what the subject is. Somebody, like a very old friend or a total stranger.
I want to talk and the bad part of it is, I made 10 calls and all in vain, some are asleep, some are no reachable and some are just not picking up. So, here I am, dying to talk and nobody is there to listen. However, I have paper and pen (thanks to my habit); hence, I decided to just write out this feeling.

अस लिहून काढल की बर वाटत. असं काही झाल ना की मग आपण किती lonely, आपल्याला कुणीच नाही, वगैरे वगैरे वाटायला लागत. मला माहीतिये, ही एक phase आहे. एक छान झोप झाली भरपेट जेवलो किंवा आणखी काही मनासारखा झालं की ती संपून जाणार आहे. पण ती हुरहुर आणि phase वाईट असते. प्रत्येक क्षण संदीपच्या कवितेसारखा "रेंगाळत रेंगाळत" जात असतो. लहानपणी अर्थशास्त्राच्या पुस्तकात व्याख्या वाचली होती "मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. तो समाजात जगतो, वाढतो, विचार करतो. त्याचे समाजातील इतर घटकांशी संबंध येत असतात...". हे असं काही feeling आल की खात्री पटते आपण मनुष्य असल्याची आणि त्याचबरोबर "communicate" ह्या क्रियापदाचा (Transmit thoughts or feelings) हा अर्थही पटतो. This is exactly what I am missing right now.