गेल्या
आठवड्यात कुणीतरी विचारले, काय रे, खूप दिवसात काही नवीन नाही वाचल तुझ्याकडून. सवयीप्रमाणे
हसून विषय टाळला. इतरांना टाळता येत, पण स्वताला
कसा टाळणार…
मी
१: “आजकाल काय नवीन लिहिलस?”
मी
२: “काही नाही”
मी
१: “अरे, कधीतरी लिहिलं असशील ना?”
मी
२: “नाही रे. शेवटची कविता लिहिली त्याला उलटून तीन वर्षतरी झालीत, दैनंदिनीची दैना
तर विचारूच नकोस”
मी
१: “का रे, काय झाले?”
मी
२: “काही विशेष नाही.”
मी
१: “मला वाटलं इतके महत्वाचे टप्पे आलेत आयुष्यात, त्याच काही छानसं टिपण केल असशील.”
मी
२: “हाच प्रश्न दुसऱ्याकुणी विचारला असता तर सांगितले असते कि, सुचत नाही आजकाल. खर
सांगू का, तस नाहीये; खरतर वेळच नाही मिळत. काय होत कि, एक काहीतरी कल्पना डोळ्यासमोर
येते, sorry, येते म्हणण्यापेक्षा समोर जे असत त्यात काहीतरी वेगळेपण दिसत. त्या कल्पनेभोवती
शब्द गुंफायला लागले कि काहीतरी जन्म घेतं; कविता, लेख, रोजनिशी, चारोळी वगैरे. पण
शब्द गुंफण्यासाठी त्या गोष्टीचा थोडा विचार करावा लागतो. थोडावेळ त्याबरोबर घालवला
कि पुढच आपसूक येत. पण नेमकं तेच जमत नाही आणि मग रोजच्या गडबडीत ती कल्पना हरवून जाते,
शब्दरूप होण्याआधी.
मी
१: “म्हणण्यात खंत जाणवते आहे तुझ्या.”
मी
२: “नाही. ते तस होतंय याची खंत नाहीये मला, पण वाईट वाटत कधी कधी. गेल्या काही वर्षात
आयुष्यात इतके बदल घडले, ते सारे जगण्यात, अनुभवण्यात वेळ कसा जातोय ते कळलेच नाही. लिहितांना ज्या परिस्थितीबद्दल लिहितो,
त्यातून बाहेर येवून ती एका त्रयस्थासारखी पहावी लागते. आयुष्यात मी इतका रममाण झालोय
कि त्यातून बाहेर येऊन त्याबद्दल लिहावं अस नाही वाटलं गेल्या काही वर्षांत. आयुष्य
पूर्णपणे जगण्यात मी आनंदी आहे, कधी त्याबाहेर येण्याची इच्छा झाली नाही, आयुष्यात
इतके कंगोरे आलेत कि त्यांनाच पूर्णपणे वेळ देत येत नाही. मग या सगळ्यात राहून जातं
लिखाण”
मी
१: “हे बघ, सुचत कस हे तुझ म्हणण मला पटतंय. गडबडीत कल्पना हरवून जाते हे सुद्धा पटण्या
सारखे आहे. पण निव्वळ वेळ नाही म्हणून लिहिण होत नाही हे काही मला पटत नाही. गेल्या
महिन्यातला हेंल्थचेकप आठव.”
डायटीशियन:
(रिपोर्ट्स पाहून) "व्यायाम का करत नाही ?".
मी
२: " रोजच्या व्यापात नाही जमत हो, वेळच नसतो”.
डायटीशियन:
"एका आठवड्यात TV, laptop वर साधारणत: किती वेळ टाईमपास करता?"
मी
२: "रोज ४५-६० मिनिटे आणि वीकेंडला १-२ मूवि, म्हणजे ७ दिवसात १२-१५ तास",
डायटीशियन:
(उत्तरावर हसुन) "हाच वेळ तुम्ही, तर जे तुमच्यासाठी महत्वाच आहे त्यासाठी का
नाही घालवु शकत?
मी
२: "……"
डायटीशियन:
"प्रश्न वेळेचा नसतो, प्रश्न priorityचा असतो, कितीही काम असल तरी भाजी आणताच
ना? मासिक बिल भरणे राहू देता का? नाही ना. कारण या गोष्टीना तितकं महत्व देता. आपणच
ठरवायचं महत्व कशाला द्यायचं, वेळ आपोआप निघतो"
मी
२: "हो चांगलच आठवतय, आणि तसेही तू कुठे विसरू देणार आहेस… "
मी
१: "नाहीच विसरू देणार, लिहिण हे आपल्या "मी" असण्याचा भाग आहे. आपल्याला
ते आवडत, त्यातून आपल्याला आनंद मिळतो, त्यामुळे त्याला तितकी priority दिली पाहिजे, जे मला तरी दिसतंय कि तू
देत नाहीयेस. मी पण तुला हेच सांगेन, तू ठरव
महत्व कशाला द्यायचं, वेळ आपोआप निघेल.”
Khup diwas kahich post nahi kela ka? -- Rashmi P
ReplyDelete