आज कसला तुफान पाऊस पडतोय, एकदम आडवातिडवा… आणि खुप वारापण. ऑफिसमधून निघालो, लिफ्ट मधून बाहेर निघालो तर रिसेप्शन मध्ये खुप सारे जमा झालेले दिसले, पाऊस थांबण्याची वाट पहात. त्यांना पाहुन अंगात वीरश्री संचारली. पॅन्ट फोल्ड केली; iPod कानात टाकून, पामरांवर एक कटाक्ष टाकला आणि आम्ही बाहेर. बरोबर एअरटेलची लहानशी छ्त्री आणि आव मात्र पावन खिंड पार करण्याचा. शफल ऑन केला, पहिलच गाण शुभा मुदगलच; "अब के सावन", झक्कासच. Engineering च्या शेवटच्या सेमचा शेवटचा दिवस आठवला.
भिजू नये म्हणून होस्टेल पालथे घालून उधार घेतलेली गाडी अर्ध्यारस्त्यात बंद पडल्यावर मी आणि मित्राने चिंब भिजत, पौड रोडवर दुर्गा पासून nalstop पर्यंत ढकलत नेलेली, हेच गाणं जोरजोराने म्हणत. मग काय, ते आठवल्यावर तर आम्ही एकदम राजे mode मध्ये. आता काय पावसाला भीड घालणार. फुल्ल volume करुन आम्ही रोडवर. दोन पावलात, फ्लोटर व फुटभर पॅन्ट ओली. पण आता तमा कशाची, लोक थांबलेत, झाडाखाली वाट पहात, मी मात्र मस्तपैकी भिजत भिजत चालतोय, "मखमलीसी ये फुहारे उड रही है यहा...". छत्रीच हे बर असत, भिजल्याच समाधानही मिळत आणि डोकही वाचत. पण आता मोबाईलमधे पाणी गेल नाही म्हणजे मिळवल.
No comments:
Post a Comment