आज गौरीचे "दुस्तर हा घाट" वाचुन झाले. तिच्या इतर पुस्तकांप्रमाणेच हेही भिडले मनाला. एकदम वेगळ्या पातळीवरचे आहे तिचे लिखाण. काही विचार, डोक्यात अजुन फिरत आहेत. दुखावलेल्या नमूला सावरण्यासाठी ऍलिस्टर तिला तर्कशुद्ध विचार करायला सांगतो. तेव्हा ती म्हणते, "तर्कशुद्ध विचारसरणी हा मनाच्या दु:खावरचा उपाय नाही. जन्माला आलेला प्रत्येक प्राणी मरणार हे ठाउक असणं तर्कशुद्ध आहे पण म्हणून उद्या मी मेले तर तुला दु:ख नाही होणार?".
कथेत पुढे, नमू, झालेल्या गोष्टींचा विचार करतांना म्हणते, "आयुष्याचा अर्थ फक़्त मागे वळून बघतांना लागतो पण ते जगावं मात्र लागत पुढे बघत". इथे मी speechless.... Isn’t this exactly what Steve Jobs said in Commencement Speech at Stanford in 2005.
"You can't connect the dots looking forward; you can only connect them looking backwards. So you have to trust that the dots will somehow connect in your future." (To watch the recording of this speech click here!)
No comments:
Post a Comment