Avoid Copy Paste

Monday, July 19, 2010

कृष्णा

कृष्णा
रविवारी सकाळी सकाळी टेबलावर ठेवलेला मोबाइल vibrate mode मुळे गुरगुरला. कालची संध्याकाळ जरा हेक्टिकच होती. ३ तासाचा romantic (?) movie पाहून प्रिया (माझी would be ) ला घरी सोडलं. त्याचा hangover घालवण्यासाठी टॅन्सी, रिमा आणि शेट्टी बरोबर उतू जाई पर्यंत कबाब खाल्ले आणि वरून २ ग्लास रेड वाईन. घरी पोचेपर्यंत ३ वाजले. सुखाने झोपावं म्हणून मोबाइल silent करून उताणा पडलो.
प्रिया इतक्या सकाळी फोन करणार नाही. रविवारी तर नाहीच नाही. असेल कुणीतरी म्हणून ignore मारला. पण २ वेळा बंद होऊनही तिसऱ्यांदा रिंग वाजली तेव्हा तिरमिरीत अ, भ ने सुरु होणाऱ्या शिव्या (मनात) देत चरफडत उठून फोन घेतला. कृष्णेचा फोन.
"गुरु ?" एकदम सावध प्रश्न.
"हो"
"मग १९ रिंग्ज वाजेपर्यंत उचलला का नाहीस" ती almost किंचाळत म्हणाली.
"झोपलो होतो"
"आता उठलास का मग"
"हो"
"गुड. मी airport बाहेरच्या आपल्या 24-hr cafe मध्ये बसलीये "
"तू ? पुण्यात ??" मी उडालोच "कधी आलीस, कशी काय... "
मला वाक्यही पूर्ण करू न देता ती परत ओरडली. "24-hr cafe अजून कुठे आहे ?"
"बर बर. आता सरळ सांगणार का?"
"भेटल्यावर सांगते. माझ्याकडे थोडाच talktime शिल्लक आहे, आणि मी रोमिंगवर आहे. तुझा बाबा आझम 486 जिवंत आहे का अजून? " (माझ्या P4 ला उद्देशून)
"हो आहे आजून. पण का?"
"१००० चा online recharge मार माझ्या नंबरवर. घोड्याचे लगाम उचल आणि निघ लवकर"
"जरा आवरतो आणि......"
"ए ! दातबीत घासत बसू नको. चुळ भर आणि निघ. चहा मी पाजते तुला आल्यावर"
"बर बाई. आलोच मी, एक पाऊण तासात"
"पाऊण तास ??? काय बाबांच्या यो बाईक वर येतोस काय? कि प्रियाने तुझा इतका brain wash मारलाय कि 220 CC Pulsar तु scooty सारखी चालवायला लागलास ?"
"कृष्णे !!!"
" ok ok, sorry. Usually २० मिनीटात येणारा तु ४५ मिनीटे म्हणालास म्हणुन जरा चिडचिड झाली. एकतर इथे मी एकटीच आहे आणि जाग्रणामुळे कंटाळली आहे. ये लवकर"

बऱ्याच दिवसांनी अंगात वारं भरल्यासारखी गाडी काढली. गार हवा कानावरून जायला लागली तश्या आठवणी झर झर सरकून गेल्या.
कृष्णाची पहिली भेट. First year ला. म्हणजे मी नाही भेटलो, तिच भेटली. तेव्हा मुलींशी बोलण्याइतके साहस कुठे होते :)

मी एका typical, निव्वळ option नाही म्हणून, गरजेपोटी एकत्र आलेल्या एका ग्रुपमध्ये होतो (obviously, तिथे सर्व मुलंच होती). कृष्णा एकदम आली आणि म्हणाली, "तू गुरु ना? first in board?"
"ho" मी उत्तरलो. माझ्याकडे वळलेल्या नजरांमुळे कावराबावरा होत. त्या नजरांमध्ये माझ्या कौतुकापेक्षा, एक मुलगी (आणि तीही छान दिसणारी) माझ्याशी स्वतःहून बोलतेय याचा हेवा होता.
"मी कृष्णा, तू कविता छान लिहितोस".
मी उडालोच. Usually "त्या" पहिल्या प्रश्नानंतर मला पुढचे नेहेमीचे, कुठला, कसा, कोण, क्लास कोणता वगैरे प्रश्न अपेक्षित होते. मी लिहिलेलं कुणी वाचत असेल, follow करत असेल अस वाटल नव्हतं मला.
"भेटू पुन्हा" ती हात पुढे करत म्हणाली. पुन्हा एकदा conscious होत मी handshake केला, त्याच "हेवा" नजरांच्या observation खाली.

"च्यायला, सकाळ आहे म्हणून काय नोएन्ट्री मधून यायचे ? " ब्रेक लावत समोरून येणाऱ्या काकांवर मी ओरडलो. त्याकडे लक्ष्यही ना देता काका निघूनही गेले. मग मीही चरफडत गाडी start केली. अठराव्या मिनीटाला विजयी मुद्रेने क्रुष्णेसमोर येउन बसलो.

"एक Ginger Tea, extra strong, without milk तिने माझासाठी आरोळी ठोकली" आणि order घेण्यासाठी येत असलेल्या वेटरला अर्ध्य़ातुनच परतवले.
"आत्ताच सुहासचा फोन ठेवला. सिडनीला जाऊन बसलाय माझा हिरो गेल्या १५ दिवसांपासुन". सुहास = क्रुष्णेचा धनी (तिच्याच शब्दात)
"मी प्रश्न विचारण्याची वाट पहाणार आहेस कि स्वत:हून बोलणार?" मी straight face देत विचारले.
"सांगते. पण त्याआधी plan ऎक. मी प्रचंड थकलीये. इथेच breakfast करु. मग pride ल जाऊ. २ रूम बुक करु. मग मी पडेन जरा"
"Hotel कशाला? माझ्या घरी रहा ना"
"नको. आपल्याला रात्री दंगा करता येनार नाही तुझ्याघरी. वरुन मी पिणार. ते तुझ्या घरी चालणार नाही"
"२ रूम?"
"मी Hotel मध्ये एकटी राहू?"
"....."
"असा प्रश्नार्थक चेहरा करु नकोस लगेच. मी रिमा आणि शेट़्टीला फोन केलाय. आपण चौघे hotel वर रहाणार. दंगापण करता येइल आणि मला रिमाची सोबत होईल झोपायला. शेट़्टीला जायचे तर जाऊ दे घरी. दुसरी रूम तुझ्यासाठी. तुला काही ईश्यू आहे का?"
"तस नाही..."
"तस अस काही नाही. पुढचे २ दिवस तु माझ्या दिमतीला हवा आहेस. उंडारण्यासाठी. रिमा, शेट़्टी असतीलच. हव तर प्रियालापण बोलव. पण तिला तिची Activa आणायला सांग. तुझ्यामागे मीच बसणार"
"अग पण..."
"तुला माहीतीयेना मी शेट़्टीच्या मागे कधीच बसत नाही. रिमाच्या Dio वर माझा विश्वास नाहीये आणि मला तुझ्या City मध्ये बसायचे नाहीये. मला बाईकवरच फिरायचे आहे."

1 comment:

  1. बास एवढंच धमाल तर सांगितलीच नाही

    ReplyDelete