Avoid Copy Paste

Friday, July 20, 2018

पाऊस

पाऊस  सुरु झाला कि आपोआपच काही गाणी मनात गुणगुणायला लागतात, आणि काही आठवणीही ताज्या होतात.  पाऊस सुरु झाल्यावर भिजायची फर्माइश केल्यावर मित्र म्हणायचा "आला पाऊस आणि आली लगेच बेडकं बाहेर"  आणि मग स्वतःच गावभर फिरवायचा पावसात. गाडीवर मागे बसुन गाणी म्हणणं आवडत काम.  पहिलं गाणं सुरु झालं कि मित्राची हमखासची कंमेंट, "कानाला वारा लागला आणि यायला लागली गाणी !" . बहुतेक वेळा सुरुवात, संदीप च्या "सरीवर सर" पासून  नाहीतर शुभा मुदगलच्या "अब के सावन ऐसे बरसे". कितीतरी वेळ अस मनसोक्त फिरल्यावर, मित्र म्हणायचं " बुरकळल्यावर", (५ मिनिटे लागली हा शब्द टाईप करायला)  दूर कुठेतरी चहासाठी थांबायचो, शक्यतो बाहेर बसायचं आणि special सांगायचे. चहा पिता पिता खडू (खयालोमे डुबा) होऊन जायचं  मग कितीतरी वेळ . मनात चालू व्हायचं "अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले" आणि आठवण यायची हे पहिल्यांदा ऐकले तेव्हाची, युनिव्हर्सिटी च्या कँटीन मध्ये सकाळी सकाळी सांबर खातांना, तिकडंच ते हिरवंगार जंगल आणि भिजत भिजत गेट पर्यंत चालत आलो, ताल मधले "प्रियसी......... " श्वास जाऊन दम लागे पर्यंत ताणलेलं . 
       -- चंद्रकांत तळेले