Avoid Copy Paste

Thursday, April 25, 2019

Sabbatical

A friend recently asked, if you get a month off from job, that too without any TODO list, what will you do. That seemed pretty easy question to me and I replied that I will send few things immediately. But as I started thinking about it, I realized, it is not that easy, especially when you don’t want to waste it. For those whom time has become the most important commodity in life, will understand why.

Over the years, it is now becoming more and more clear that health is very important and without health one will not be able to enjoy and live happily even if they have all other things, so first thing you should start is, pickup exercise routine you like and suits you, do it regularly. In our fast-paced life, mental health is become equally important. Meditation, though sound trivial, has great impact and should be included in the routine. Fortunately, I got a chance to participate in a program that is helping me in better understand mental wellbeing and I am experiencing the impact of meditation.

Next one will be, do spend some time with self, preferably alone, quietly, not even music. It might be boring, but that boredom will lead to thinking and realization of what really matters. One also realizes what you like to do, call it a hobby if you want. Pick up that activity in the schedule. Take up a language class or bakery class, it gives a great sense of satisfaction and achievement when you create something. There is nothing like having your own painting framed on your wall. Pick up few books and aim to complete those, but avoid coffee-table books

Though you have time, the family might still be continuing with their routine. Do plan and spend as much time with family as you can. This again might sound too obvious, but it is not. As I like to say,

नाती फुलांसारखी असतात. त्यांना उमलू द्यावं लागतं. पाणी बदलावं लागतं. उन दाखवावं लागतं. Basically लक्ष द्यावं लागतं. आपोआप उमलणारी गोष्ट नाही ती

Avoid spending a lot of time watching TV, surfing thru channels OR websites, or browsing thru social media, it is endless, and in my opinion, it could easily eat up most of your day without any purpose. You can pick a series to watch. But watch (only) couple of episodes in day, as series like HEROES/GOT can be keep you awake days and nights if you keep watching back to back episodes. Avoid visiting relatives and places just because you have time, it might not be a good use of time. Do this only if you really want to. Another area to avoid is shopping, online or in-store.

Friends matters. Meet friends, catchup with them. It is likely that you are already taking your friendship for granted and it already started diminishing. Use this time to rejuvenate. Go out, meet new people especially younger ones, they just have way different perspectives. Listen and observe small kids. Spend time with nature, go for a walk or hiking. Nature is probably the best healer and guide, go for cycling, if kids can join, even better.

A popular though says, just assume these are the only 30 days you got and then start living. Though this is very appealing to start with, it is not realistic. I feel, one should use (or I will say invest) this time to have a happier and healthier life after those 30 days. During this time, another aspect to work on is, what AFTER this. See how you can use this time to have WOW days even after. That might include change in work, exploring options, may be doing something else, doing some math about time-money-outcome-want. And don’t just think, act on it, you might fail in few, but you can afford that at this time and experience matters.

 

Friday, July 20, 2018

पाऊस

पाऊस  सुरु झाला कि आपोआपच काही गाणी मनात गुणगुणायला लागतात, आणि काही आठवणीही ताज्या होतात.  पाऊस सुरु झाल्यावर भिजायची फर्माइश केल्यावर मित्र म्हणायचा "आला पाऊस आणि आली लगेच बेडकं बाहेर"  आणि मग स्वतःच गावभर फिरवायचा पावसात. गाडीवर मागे बसुन गाणी म्हणणं आवडत काम.  पहिलं गाणं सुरु झालं कि मित्राची हमखासची कंमेंट, "कानाला वारा लागला आणि यायला लागली गाणी !" . बहुतेक वेळा सुरुवात, संदीप च्या "सरीवर सर" पासून  नाहीतर शुभा मुदगलच्या "अब के सावन ऐसे बरसे". कितीतरी वेळ अस मनसोक्त फिरल्यावर, मित्र म्हणायचं " बुरकळल्यावर", (५ मिनिटे लागली हा शब्द टाईप करायला)  दूर कुठेतरी चहासाठी थांबायचो, शक्यतो बाहेर बसायचं आणि special सांगायचे. चहा पिता पिता खडू (खयालोमे डुबा) होऊन जायचं  मग कितीतरी वेळ . मनात चालू व्हायचं "अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले" आणि आठवण यायची हे पहिल्यांदा ऐकले तेव्हाची, युनिव्हर्सिटी च्या कँटीन मध्ये सकाळी सकाळी सांबर खातांना, तिकडंच ते हिरवंगार जंगल आणि भिजत भिजत गेट पर्यंत चालत आलो, ताल मधले "प्रियसी......... " श्वास जाऊन दम लागे पर्यंत ताणलेलं . 
       -- चंद्रकांत तळेले 

Thursday, November 2, 2017

काही राहिलं तर नाही ना

(ह्या पोस्ट मधले लिखाण माझे नाहीव्हाट्स अँप च्या माध्यमातुन जे असंख्य फॉरवर्ड्स येतात त्यातले काही संग्रही ठेवण्या सारखे वाटलेशेयर करावेसे वाटलेतसाच हा एक लेखह्या लेखाचे सर्व हक्क त्या अज्ञात लेखका अधीन.)  

काही राहिलं तर नाही ना

जीवनामध्ये तुम्ही खूप काही मिळवलं असलं तरी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर पुढे जात असताना नेहमी हा प्रश्न सर्वांनाच पडतो... “काही राहिलं तर नाही ना?” वर्षभराच्या पोराला बाईच्या हवाली टाकून जॉबसाठी जाण्याऱ्या आईला ती बाई जेव्हा विचारते “पर्स, चावी घेतली ना, काही राहिलं तर नाही ना?” ती आई कशी सांगेल कि ज्याच्या भविष्यासाठी एवढा आटापिटा चालू आहे तोच तर राहिला !!!

खूप आशेने आईबापाने पोराला शिकविले. पोरगा परदेशात सेटल झाला. नातू जन्मला म्हणून आजी आजोबा टूरिस्ट विसावर गेले. ३ महिने झाल्यावर निघताना पोरगा सहजच बोलून गेला “सगळ चेक करून घ्या, काही राहिलं तर नाही ना?”काय उत्तर द्यावे त्या म्हातार्यांना कळेना कारण “आता मागे राहायला शिल्लक तरी काय आहे”

लग्न होऊन पोरगी वरातीसोबत निघून गेली तेव्हा बापाला आत्या विचारते “दादा, पोरगी काही विसरली नाही ना रे, काही राहिलं तर नाही ना?” भूतकाळात गेलेल्या त्या बापाला पोरीच्या रूम मध्ये सुकलेली फुले दिसतात. अश्रू लपवत लपवत बाप बोलला “ती गेली पण आठवणी इथेच राहिल्या, दुसरे काय राहणार”

६० वर्षे वय झाल्यावर आज साहेबाचा ऑफिसमध्ये शेवटचा दिवस होता. चपरासी बोलला  “साहेब, काही राहिलं तर नाही ना?”         साहेबानी डोळे बंद केले तर लक्षात आले कि पूर्ण आयुष्य या जागी काम करण्यात केले. सगळ्च इथे आहे मग “मागे काय राहणार” 

स्मशानात चितेला अग्नी देऊन बाहेर पडलेल्या पोराला मित्र विचारतो “मित्रा, काही राहिलं तर नाही ना?” तो धावत धावत परत अग्नीजवळ गेला, चेहरा पाहण्यासाठी केलेला प्रयत्न अयशस्वी झाला. त्याला उमजेना कि काय राहून गेले. डोळे पुसत पुसत तो म्हणाला “काही नाही रे, जे राहिले ते आता सदा स्मरणात राहील”

एकदा तरी वेळ काढून मागे बघा. जुन्या आठवणी ताज्या करा. डोळे भरून येईल. मन प्रफुल्लित होईल आणि आत्ताचा हा क्षण जगण्याची नवी उमेद मिळेल. मग कधीही काहीच मागे राहणार नाही.

(ह्या पोस्ट मधले लिखाण माझे नाहीव्हाट्स अँप च्या माध्यमातुन जे असंख्य फॉरवर्ड्स येतात त्यातले काही संग्रही ठेवण्या सारखे वाटलेशेयर करावेसे वाटलेतसाच हा एक लेखह्या लेखाचे सर्व हक्क त्या अज्ञात लेखका अधीन.)  

Tuesday, June 27, 2017

सोबत

(ह्या पोस्ट मधले लिखाण माझे नाही. व्हाट्स अँप च्या माध्यमातुन जे असंख्य फॉरवर्ड्स येतात त्यातले काही संग्रही ठेवण्या सारखे वाटले; शेयर करावेसे वाटले, तसाच हा एक लेख. ह्या लेखाचे सर्व हक्क त्या अज्ञात लेखका अधीन.)  

सोबत

आजकाल कुणाशीही बोलावसं वाटत नाही. खूप खूप कंटाळा येतो. सगळीकडे मुखवटे चढवलेले चेहरे. ज्याची पाठ फिरेल त्याची निंदा करणारे. ह्यांची मानसिकता इतकी चीप असते ना की नको वाटतं. इतकं खोटं कसं काय ते वागू शकतात? ह्यात आपले लोक पण असतात हे विशेष! ज्यांच्यासाठी तुम्ही कितीतरी वेळेला एडजस्टमेंट केलेली असते ते देखील एका नकाराने बदललेले बघितले आणि वाटलं, ‘आपण एकटे असतो तेच बरं असतं.’ ह्यांच्यापेक्षा पुस्तकांमध्ये आणि छंदामध्ये रमावं, मन प्रसन्न राहतं आणि नकारात्मक गोष्टींपासून तुम्ही स्वाभाविकपणे दूर जाता. 

कधीतरी अशी वेळ येते की तुम्हाला माणसांचाच कंटाळा येऊ लागतो. त्यांना सांभाळून घेताना तुमची प्रचंड दमछाक होते.प्रत्येकाचे मूड्स संभाळण, त्यांच्या मनाप्रमाणे वागणं ह्या सगळ्यात आपण पार दमून जातो. सतत दुसऱ्यांचा विचार करताना आपल्याला “स्वतःला काय हवं आहे” हा प्रश्न कधी मागे राहतो हे काळतच नाहि. आपण इतकं सगळं करूनही आपल्याला प्रेमाचे दोन शब्द, नात्यात हवा असलेला आदर, विश्वास, आपुलकी मिळते असंही नाही.

मग अशा वेळी प्रश्न पडतो “हे सगळं कशासाठी?”

खूप विचार केला की ह्या प्रश्नाचे एक उत्तर असं मिळतं ते म्हणजे – “आपण एकटेपणाला घाबरतो.”

सुरक्षतेसाठी कळपात राहिलं पाहिजे हि एक चुकीची मानसिकता आपल्यात रुजलेली असते. एकटे पडू या भीतीमुळे अनेकदा आपण चुकीच्या गोष्टींना सपोर्ट करतो. मनात नसूनही अनेक गोष्टी स्वीकारत जातो. मोठे होतो पण “सोबत”, “मैत्री” ह्या गोष्टींचे आणि नात्यांचे खरे अर्थ विसरतो. लोकांनी शरीराने आपल्या सोबत असण्याला “सोबत” असं गोंडस नाव देतो. आपणही तसेच खोटे वागत जातो, पण एक क्षण असा येतो जेव्हा हा माणसांचा गोतावळा नकोस होतो. मोजकीच पण चांगली माणसं हवीत असं वाटू लागतं. ह्या मुखवट्या मागचे चेहरे भेसूर वाटू लागतात आणि आपण पुन्हा स्वतःकडे वळतो. जाणीवेचा एकच क्षण असतो आणि तो आपल्या हातून कधीच निसटू द्यायचा नसतो.

‘मी उत्तम तेच करीन आणि चांगल्या लोकांच्या सोबतीतच राहीन’ असा मनाशी निश्चय केला की आपली निवड बदलत जाते आणि पर्यायाने आयुष्यही बदलतं. मोजकीच पण प्रेमळ, आपल्याशी प्रामाणिक भावनेने जोडलेली, वेळ प्रसंगी हितासाठी थोडीशी रागावणारी माणसं म्हणजे खरी –

“सोबत…!”

माणसांच्या गर्दीत चालताना आपला दीपस्तंभ कुणाला मानायचं हे आपणच ठरवायच

(ह्या पोस्ट मधले लिखाण माझे नाही. व्हाट्स अँप च्या माध्यमातुन जे असंख्य फॉरवर्ड्स येतात त्यातले काही संग्रही ठेवण्या सारखे वाटले; शेयर करावेसे वाटले, तसाच हा एक लेख. ह्या लेखाचे सर्व हक्क त्या अज्ञात लेखका अधीन.)  

Thursday, September 24, 2015

आजकाल काय नवीन लिहिलस?


गेल्या आठवड्यात कुणीतरी विचारले, काय रे, खूप दिवसात काही नवीन नाही वाचल तुझ्याकडून. सवयीप्रमाणे हसून विषय टाळला.  इतरांना टाळता येत, पण स्वताला कसा टाळणार 

मी १: “आजकाल काय नवीन लिहिलस?”
मी २: “काही नाही
मी १: “अरे, कधीतरी लिहिलं असशील ना?”
मी २: “नाही रे. शेवटची कविता लिहिली त्याला उलटून तीन वर्षतरी झालीत, दैनंदिनीची दैना तर विचारूच नकोस
मी १: “का रे, काय झाले?”
मी २: “काही विशेष नाही.”
मी १: “मला वाटलं इतके महत्वाचे टप्पे आलेत आयुष्यात, त्याच काही छानसं टिपण केल असशील.”

मी २: “हाच प्रश्न दुसऱ्याकुणी विचारला असता तर सांगितले असते कि, सुचत नाही आजकाल. खर सांगू का, तस नाहीये; खरतर वेळच नाही मिळत. काय होत कि, एक काहीतरी कल्पना डोळ्यासमोर येते, sorry, येते म्हणण्यापेक्षा समोर जे असत त्यात काहीतरी वेगळेपण दिसत. त्या कल्पनेभोवती शब्द गुंफायला लागले कि काहीतरी जन्म घेतं; कविता, लेख, रोजनिशी, चारोळी वगैरे. पण शब्द गुंफण्यासाठी त्या गोष्टीचा थोडा विचार करावा लागतो. थोडावेळ त्याबरोबर घालवला कि पुढच आपसूक येत. पण नेमकं तेच जमत नाही आणि मग रोजच्या गडबडीत ती कल्पना हरवून जाते, शब्दरूप होण्याआधी.

मी १: “म्हणण्यात खंत जाणवते आहे तुझ्या.”

मी २: “नाही. ते तस होतंय याची खंत नाहीये मला, पण वाईट वाटत कधी कधी. गेल्या काही वर्षात आयुष्यात इतके बदल घडले, ते सारे जगण्यात, अनुभवण्यात वेळ कसा जातोय  ते कळलेच नाही. लिहितांना ज्या परिस्थितीबद्दल लिहितो, त्यातून बाहेर येवून ती एका त्रयस्थासारखी पहावी लागते. आयुष्यात मी इतका रममाण झालोय कि त्यातून बाहेर येऊन त्याबद्दल लिहावं अस नाही वाटलं गेल्या काही वर्षांत. आयुष्य पूर्णपणे जगण्यात मी आनंदी आहे, कधी त्याबाहेर येण्याची इच्छा झाली नाही, आयुष्यात इतके कंगोरे आलेत कि त्यांनाच पूर्णपणे वेळ देत येत नाही. मग या सगळ्यात राहून जातं लिखाण 

मी १: “हे बघ, सुचत कस हे तुझ म्हणण मला पटतंय. गडबडीत कल्पना हरवून जाते हे सुद्धा पटण्या सारखे आहे. पण निव्वळ वेळ नाही म्हणून लिहिण होत नाही हे काही मला पटत नाही. गेल्या महिन्यातला हेंल्थचेकप आठव.”  

डायटीशियन: (रिपोर्ट्स पाहून) "व्यायाम का करत नाही ?".

मी २: " रोजच्या व्यापात नाही जमत हो, वेळच नसतो”.

डायटीशियन: "एका आठवड्यात TV, laptop वर साधारणत: किती वेळ टाईमपास करता?"

मी २: "रोज ४५-६० मिनिटे आणि वीकेंडला १-२ मूवि, म्हणजे ७ दिवसात १२-१५ तास",

डायटीशियन: (उत्तरावर हसुन) "हाच वेळ तुम्ही, तर जे तुमच्यासाठी महत्वाच आहे त्यासाठी का नाही घालवु शकत?

मी २: "……"

डायटीशियन: "प्रश्न वेळेचा नसतो, प्रश्न priorityचा असतो, कितीही काम असल तरी भाजी आणताच ना? मासिक बिल भरणे राहू देता का? नाही ना. कारण या गोष्टीना तितकं महत्व देता. आपणच ठरवायचं महत्व कशाला द्यायचं, वेळ आपोआप निघतो"

मी २: "हो चांगलच आठवतय, आणि तसेही तू कुठे विसरू देणार आहेस "
मी १: "नाहीच विसरू देणार, लिहिण हे आपल्या "मी" असण्याचा भाग आहे. आपल्याला ते आवडत, त्यातून आपल्याला आनंद मिळतो, त्यामुळे त्याला तितकी  priority दिली पाहिजे, जे मला तरी दिसतंय कि तू देत नाहीयेस. मी पण तुला हेच सांगेन, तू ठरव  महत्व कशाला द्यायचं, वेळ आपोआप निघेल.”